Loading
शिवाजी महाराज ज्या विचारसरणीच्या विरोधात लढले त्याच विचारसरणी विरोधात आज काँग्रेस पक्ष लढत आहे. भाजपने शिवाजी महाराजांचा पुतळा बनवला आणि काही दिवसांनी पुतळा कोसळला, कारण त्यांचा हेतू चुकीचा होता. शिवाजी महाराजांचा पुतळा बनवायचा असेल तर तुम्हाला शिवाजी महाराजांच्या विचारसरणीचे रक्षण करावे लागेल, असा संदेश भाजपला त्यातून दिला आहे. भाजपची विचारधाराच चुकीची आहे. त्यांनी आदिवासी राष्ट्रपतींना राम मंदिर आणि संसदेच्या उद्घाटनाला येऊ दिले नाही. हा राजकीय लढा नसून विचारधारेचा लढा आहे, असे राहुल गांधी म्हणाले